top of page

तू समीप किआभास हा...

  • Writer: shubham gadre
    shubham gadre
  • Nov 25, 2018
  • 1 min read


तू समीप कि, आभास हा,

मी स्पंदने तू श्वास हा,

भास कि विश्वास हा तुझाss IIधृII


गुंतलेले मन हे माझे,

गुंतलेल्या भावना,

स्तब्ध अन घायाळ मन हे,

साद घाली तुज मना,


दे साथ तू आहे उभा,

तू हो माझी, अन मी तुझा,

भास कि विश्वास हा तुझाss II1II


दिव्य ते आकाश मी अन,

तू निरागस चंद्रमा,

प्रीत ती बहरून झाली.

आसमंती पौर्णिमा,


ती साद गेली तुज मना,

मी पाहतो गं तुज पुन्हा,

भास कि विश्वास हा तुझाss II2II


- शुभम गद्रे

Comments


bottom of page