top of page

सुखाचा पाऊस

  • Writer: shubham gadre
    shubham gadre
  • Nov 25, 2018
  • 1 min read


आज सुखाचा पाऊस,

चिंब न्हाऊनचं गेलो,

भल्या कष्टांच्या ढगांचे,

मी आभार मानले,


काळ तप्त सूर्याचा,

गेला आता ढगाआड,

अन सुखाचा सुगंध,

अवकाशी दरवळला,


मन झाले गार चिंब,

झाले तयार-तयार,

ध्यास मोठ्या आकांक्षांचा,

मी घेऊनि निघालो..


- शुभम गद्रे

1 Comment


vishwajitvs25
Dec 24, 2018

Nice one...

Like
bottom of page