top of page

प्रेमाची सकाळ

  • Writer: shubham gadre
    shubham gadre
  • Nov 25, 2018
  • 1 min read

Updated: Dec 2, 2018



नभ टेकले धरतीला,

गार वारा आला आला,

उन्ह पावसाचा खेळ,

तुला भिजवूनी गेला,


उन्ह कधी हे कोवळे,

रान हिरवे मोकळे,

धरतीने हे घातले,

जणू हिरवे सोवळे,


तुझे केस वाऱ्यासंगे ,

असे उडू हे लागले,

जणू झावळ्या माडाच्या,

नभात त्या झुलू पाहे,


तुझे हास्य ग ते सखे,

जणू चंचल नदीचे,

पाणी खळा-खळा वाहे,

मन भरुनी प्रीतीचे,


आहे दूर ती क्षितिजे,

पण नाही मृगजळ,

मनामध्ये गं वाटते,

आता नाही दूर फार,


ओल्या-ओल्या सरी गार,

अशी शांत संध्याकाळ,

मनामध्ये गं आपुल्या,

झाली प्रेमाची सकाळ..


- शुभम गद्रे

Comments


bottom of page