top of page

मेघदूत

  • Writer: shubham gadre
    shubham gadre
  • Nov 25, 2018
  • 1 min read

आसमंती च्या मेघा,

उत्तुंग जा तू परिक्रमा,

आठ्वण आली प्रियेची,

संदेश तू दे प्रियकरा...


या अथांग रे नभी,

चमकली विद्युलत्ता, 

भास झाला मज मनी,

बिलगली गं तू मला..


मज मनीची प्रीत आता,

लागली हि खुलायला,

मन माझे नर्तले जणू,

मयूर रे पर्जन्याला..


प्रीत ती दूर, वन घनघोर,

भेट रे हि लांबली

वाट ती दूर, वाट पाहत,

ती तशीच थांबली.. 


रे मेघा, तू जा पुन्हा,

अश्वस्थ कर मज प्रियकरा,

आज जरी विरह, नसे हा शाश्वत,

मिलन होईल लवकारा...


मेघदूता, मी तुझा,

मनोमनी कृतज्ञ हा,

पर्जन्य होऊन, तू बरसुन,

मिळूदे मुक्ती तुला...


       - शुभम गद्रे

 
 
 

Recent Posts

See All
शायरी

दिल भी साला अजीब है, साथ है पर पास नही, और वक्त भी साला अजीब है, पास है पर साथ नही... - शुभम गद्रे

 
 
 

Comments


bottom of page