विचार
- shubham gadre

- Nov 25, 2018
- 1 min read

अविचाराच्या विचाराने,
अतिविचार करू लागलो,
अतिविचाराच्या अविचाराने,
अतिविवेकी वागू लागलो,
अतीविवेकाच्या विचाराने,
विचारमग्न होऊ लागलो,
अन या विचारांच्याच विचारांमुळे,
विचार करणं सोडू लागलो...
विचार करणं सोडल्यावर मनात,
विचार आला एकच,
एवढा विचार करून जगण्यापेक्षा,
न विचार करणं ठीकच...
- शुभम गद्रे


Comments